News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

मीडिया आणि लोकांशी विनम्रतेने वाग, प्रशासकीय समितीची विराटला तंबी

यावर विराटने काय उत्तर दिलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु विराटने हा सल्ला फारच मनावर घेतल्याचं, ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटचाहत्याला भारतातून चालता होण्याचा सल्ला दिल्याने बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने नाराजी व्यक्त केली आहे. मीडिया आणि लोकांशी विनम्रतेने वाग, अशी तंबी प्रशासकीय समितीने कोहलीला दिल्याचं समजतं. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुक्रवारी रवाना झाला आहे. 21 नोव्हेंबरपासून दौऱ्यातील पहिला ट्वेण्टी 20 सामना खेळवण्यात येईल. त्या पार्श्वभूमीवर विराटला ही ताकीद देण्यात आली आहे. परदेशी खेळाडू आवडत असल्यास भारतातून चालता हो, असा सल्ला विराट कोहलीने क्रिकेटचाहत्याला दिला होता. मात्र त्याचा हा सल्ला प्रशासकीय समितीला रुचला नाही. यासंदर्भात समितीने विराट कोहलीशी फोनवरुन बातचीत केली. "मीडिया आणि लोकांशी विनम्रतेने वाग. तसंच तुझं वर्तन हे भारतीय कर्णधाराला साजेसं असावं," असं समितीने त्याला सांगितलं. यावर विराटने काय उत्तर दिलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु विराटने हा सल्ला फारच मनावर घेतल्याचं, ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं. काय आहे प्रकरण? "भारतीय खेळाडू ओव्हररेटेड आहेत. एक फलंदाज म्हणून सध्या विराट कोहलीचं खूपच स्तोम माजवण्यात येत आहे. त्याच्या फलंदाजीत विशेष असं काही नाही. सध्याच्या भारतीय फलंदाजांपेक्षा मला इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज अधिक भावतात," असं एका चाहत्याने लिहिलं होतं. त्यावर परदेशी खेळाडू आवडत असल्यास भारतातून चालता होण्याचा सल्ला विराट कोहलीने दिला. यानंतर त्याच्यावर जोरदार टीका व्हायला लागली. ट्रोल झाल्यानंतर विराट कोहलीने ट्विटरवर उत्तर दिलं. "मला ट्रोलिंगची सवय आहे. कमेंट्समध्ये 'हे भारतीय' ज्या पद्धतीने लिहिलं होतं, त्याबद्दल मी भाष्य केलं, मी कायमच व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करत आलो आहे. फार गांभीर्याने घेऊ नका. सणाचा आनंद घ्या," अशा आशयाचं ट्वीट विराटने केलं होतं.
Published at : 17 Nov 2018 11:11 AM (IST) Tags: COA Virat Kohli

आणखी महत्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Kedar Jadhav : रेवती सुळे, कुंती पवारांवर केदार जाधवचे खळबळजनक आरोप; आता रोहित पवारांनी सगळं काढलं, नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar on Kedar Jadhav : रेवती सुळे, कुंती पवारांवर केदार जाधवचे खळबळजनक आरोप; आता रोहित पवारांनी सगळं काढलं, नेमकं काय म्हणाले?

Sara Tendulkar: 'माझं स्वप्न पूर्ण झालं…’ सचिन तेंडुलकरच्या लेकीचा अस्खलित मराठीत बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल, म्हणाली..

Sara Tendulkar: 'माझं स्वप्न पूर्ण झालं…’ सचिन तेंडुलकरच्या लेकीचा अस्खलित मराठीत बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल, म्हणाली..

WPL 2026 News : 5 संघ, 28 दिवस, 22 सामने… क्रिकेटचा महासंग्राम! आज मुंबई-बंगळुरू आमनेसामने, कुठे LIVE बघणार मॅच?

WPL 2026 News : 5 संघ, 28 दिवस, 22 सामने… क्रिकेटचा महासंग्राम! आज मुंबई-बंगळुरू आमनेसामने, कुठे LIVE बघणार मॅच?

Video : रोहित मी तुला कर्णधारच बोलणार, कारण....; सूर्यकुमार यादव, शाहरुख खानसमोर जय शाह मनातलं सगळं बोलले, VIDEO

Video : रोहित मी तुला कर्णधारच बोलणार, कारण....; सूर्यकुमार यादव, शाहरुख खानसमोर जय शाह मनातलं सगळं बोलले, VIDEO

Ruturaj Gaikwad News : 8 चौकार, 6 षटकार... तुफानी शतक ठोकत मराठमोळ्या ऋतुराजचा ऐतिहासिक पराक्रम! पाकिस्तानच्या बाबर आजमचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

Ruturaj Gaikwad News : 8 चौकार, 6 षटकार... तुफानी शतक ठोकत मराठमोळ्या ऋतुराजचा ऐतिहासिक पराक्रम! पाकिस्तानच्या बाबर आजमचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

टॉप न्यूज़

Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन

Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन

Sangli Municipal Corporation Election: सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?

Sangli Municipal Corporation Election: सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?

काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल

काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल

गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी

गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी